Ambadas Danve | सरकारने ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचे नाव बदलून ‘मृत्यू आपल्या दारी’ करावे – अंबादास दानवे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे आणि औषधांच्या तुतड्यामुळे या लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

याच पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. सरकारने आपल्या ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचे नाव बदलून ‘मृत्यू आपल्या दारी’ करावे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

50 crores have been given to Hafkin

ट्विट करत अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “हाफकीन संस्थेला २०२२- २३ मध्ये १०८ कोटी रुपयांच औषध खरेदीच कंत्राट दिलं. मात्र त्यातील ५० कोटीच रुपये हाफकीन ला देण्यात आले आहेत.

पूर्ण पैसे मिळाळ्याशिवाय कोणतीही कंपनीचे औषध खरेदी करणार नाही अशी भूमिका हाफकीन संस्थेने घेतल्याची माहिती हाफकीनच्या अधिकारी वर्गासोबत घेतलेल्या बैठकीत मिळाली.

सरकार जनतेच्या आरोग्याच्या जीवाशी खेळतेय. दीडशे कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च केले जातात. सरकारने आपल्या ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचे नाव बदलून ‘मृत्यू आपल्या दारी’ करावे.”

दरम्यान, हाफकिन इन्स्टिट्यूट किंवा हाफकिन प्रशिक्षक संशोधन व चाचणी संस्था, ही भारतातील जीवाणू विज्ञानात संशोधन करणारी एक मुख्य संस्था आहे. 10 ऑगस्ट 1899 मध्ये प्लेग रिसर्च लोबोरेटरी या नावाने डॉ. हाफकिन यांनी या संस्थेची स्थापना केली.

राज्यातील सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन इन्स्टिट्यूटकडे देण्यात आली होती.

हाफकिन संस्थेनं औषधी खरेदी करणं बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा  जाणवत असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe