Jayant Patil | अजित पवार गटाच्या परतीचे दोर कापण्यात आलेय – जयंत पाटील

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Jayant Patil | मुंबई: वाय बी चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला सुप्रिया सुळे, शरद पवार, जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित आहे. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. अजित पवार गटाचे परतीचे दोर कापण्यात आले असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

We will not come together – Jayant Patil

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “राज्यामध्ये आंदोलन करणाऱ्यांची स्पर्धा ठेवा. एखादा प्रश्न मांडल्यावर कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या जिल्ह्यात किती आंदोलन होतात, याची नोंद ठेवायला हवी.

पुढे सत्ता आपलीच येणार आहे, त्यामुळे चिंता करायची काही गरज नाही. बऱ्याच लोकांना अशी शंका आहे की राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील.

आम्ही एक होणार नाही, यासाठी आम्हीच शपथ घेतली पाहिजे. आपला पक्ष वाढू नये, यासाठी ही फक्त कुजबूत सुरू केली आहे.”

पुढे बोलताना ते (Jayant Patil) म्हणाले, “शरद पवार आपला पक्ष वाचवण्यासाठी निवडणूक आयोगात जाऊन बसतात. त्यावरून तुमच्या लक्षात येत असेल नक्की काय प्रकार घडत आहे.

त्यामुळे आता त्यांच्या परतीचे दोर कापण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला शरद पवारांची ताकद दाखवून द्यायची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात असलेला शरद पवारांविषयीचा आदर आपलं भांडवल आहे.

मत देणाऱ्या जनतेच्या मनात शरद पवार आहे. त्यामुळे शरद पवार जिथे आहे, पक्ष तिथे आहे. शरद पवार यांच्या कार्यशैलीमुळेच त्यांना संधी मिळाली आहे. शरद पवार हुकुमशहा आहे, असं ते म्हणतात. मात्र, आम्हाला ते कधीच जाणवलं नाही.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe