Namo Samman Yojana | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojna) धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
काल (10 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नमो सन्मान निधी देण्यास मंजुरी मिळाली आहे. नमो सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्षी सहा रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे.
The 15th installment of PM Kisan Yojana can be received by the farmers before Diwali
नमो सन्मान निधी योजनेतील (Namo Samman Yojana) दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचं बोललं जात आहे. हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना सोबत मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. या योजनेतील हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनाही ई-केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण घ्यावी.
दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे.
या योजनेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर फोन करू शकतात. त्याचबरोबर pmkisan-ict@gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Ashish Shelar | आदित्य ठाकरेंसारखे टवाळखोर वाघ नखांवर प्रश्न उपस्थित करताय – आशिष शेलार
- Govt Job Opportunity | भारत सरकारच्या ‘या’ विभागात संधी, जाणून घ्या सविस्तर
- Ambadas Danve | सरकारने ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचे नाव बदलून ‘मृत्यू आपल्या दारी’ करावे – अंबादास दानवे
- Parth Pawar | अजित पवारांच्या जागी पार्थ पवार सांभाळू शकतात ‘ते’ पद
- IND vs AFG | भारत अफगाणिस्तान सामन्यातून अश्विन बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळणार संधी