Sanjay Shirsat | संजय राऊतांच्या गळ्यात कुणाचा पट्टा ठाकरेंचा की पवारांचा? – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर खोचक शब्दात टीका केली आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले जातात. भाजपने शिंदे गटाच्या गळ्यात पट्टा बांधला आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांच्या गळ्यात कुणाचा पट्टा ठाकरेंचा की पवारांचा?, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “संजय राऊत यांच्या गळ्यात नेमका कुणाचा पट्टा आहे? उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) की शरद पवारांचा (Sharad Pawar)?

आपल्या गळ्यात नेमका कोणाचा पट्टा आहे? हे आधी त्या प्राण्याने बघावं. संजय राऊत दोन-दोन पट्टे घेऊन फिरतात. दोन-दोन पट्टे घेऊन फिरणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करत आहे.

त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नादी लागू नये. एकनाथ शिंदे एखाद्या दिवशी त्यांच्या गळ्यात पट्टा टाकून त्यांना फिरवतील, याची त्यांनी काळजी घ्यावी.”

Eknath Shinde and Ajit Pawar should form their own party – Sanjay Raut

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती केली होती.

परंतु, या युतीदरम्यान त्यांनी त्यांचे विचार कोणत्याही दुसऱ्या पक्षात विलीन केले नाही. आज एकनाथ शिंदे जेपी नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर लावत आहे. गद्दर आणि बेइमानी हा अंगार नाही, हे भंगार आहे.

हिम्मत असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून लोकांसमोर जाऊन मतं मागावी. राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पाठवले जात आहेत जात आहे. त्यांच्या गळ्यात पट्टा बांधलेला आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.