IND vs AFG | अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहितची शानदार कामगिरी, एकट्याने केले ‘हे’ मोठे विक्रम

IND vs AFG | टीम महाराष्ट्र देशा: वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये काल (11 ऑक्टोबर) भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 08 गडी राखून पराभव केला आहे.

प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तान संघाने भारतीय संघाला 272 धावांचं लक्ष दिलं होतं. भारतीय संघाने 35 षटकात 02 गडी गमावत या धावा पूर्ण केल्या.

या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सामन्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहे.

Rohit Sharma played an innings of 130 runs off 64 balls

भारत विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यामध्ये रोहित शर्माने 64 चेंडूत 130 धावांची खेळी खेळली. या खेळी दरम्यान त्याने पाच षटकार आणि चार चौकार ठोकले.

तर या खेळीनंतर रोहित शर्माने आपल्या नावावर अनेक विक्रम केले. या खेळीनंतर रोहित शर्मा वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळवणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत तब्बल सात शतके ठोकली आहे.

त्याचबरोबर वनडेमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा रोहित शर्मा फलंदाज ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वात जास्त षटकार आहे. त्याने आतापर्यंत 555 षटकार ठोकले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने उत्कृष्ट सुरुवात केली होती.

या सामन्यामध्ये रोहित शर्माने 64 चेंडूत 130 धावा काढल्या तर इशान किशनने 47 चेंडूत 47 धावा आपल्या नावावर केल्या. त्याचबरोबर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने अनुक्रमे नाबाद 55 आणि 25 धावा करत संघाला विजयापर्यंत पोहोचवले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.