Supriya Sule | भाजप म्हणजे जुमला पक्ष – सुप्रिया सुळे

Supriya Sule | पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक शब्दात टीका केली आहे.

पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम या चारही समाजाच्या अनेक वर्षापासून मागण्या रखडल्या आहेत.

या समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं भाजपने सांगितलं होतं. या गोष्टीला आता साडेनऊ वर्षे होऊन गेले आहे.

आरक्षणाच्याबाबतीत महाराष्ट्रात एक मत आणि दिल्लीत वेगळे मत हा ऑन रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाचा प्रोग्राम आहे. त्यामुळे हे सरकार जुमलेबाज आहे. त्यांना काहीच करायचं नाही.

धनगर समाजाला आरक्षण देऊ असं महाराष्ट्रात म्हटलं जातं. मात्र, दिल्लीत त्यांचेच खासदार म्हणतात धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही.

तेच मराठा समाजाबद्दल देखील घडत असतं. त्याचबरोबर लिंगायत आणि मुस्लिम समाजाला त्यांनी न्याय दिलेला नाही. त्यामुळे या जुमला पक्षाकडून काहीच अपेक्षा ठेवू नये.

What has the government done in the state? – Supriya Sule

पुढे बोलताना त्या (Supriya Sule) म्हणाल्या, “या सरकारमध्ये कोण कुणाला भेटतं? याबाबत आम्हाला काहीच माहित नाही. कॅबिनेट बैठक 11 वाजता असली की ती 12 वाजता सुरू होते.

तर मुद्द्यावर यायला 1 वाजतात. गेल्या दीड वर्षापासून राज्यात ट्रिपल इंजिन आणि खोके सरकार आहे. या कालावधीमध्ये त्यांनी राज्यात काय केलं आहे? नांदेडमध्ये हत्या झाली, हे त्यांचं कर्तुत्व आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.