Sharad Pawar | “… म्हणून छगन भुजबळांचा तो निर्णय आम्ही स्वीकारला नाही”; भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar | अकोला: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

अशात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवारांबाबत मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष करून भाजपसोबत जाण्याचा शरद पवारांचा डाव होता, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

We did not agree to go with BJP – Sharad Pawar

अकोल्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करावं, हा प्रस्ताव छगन भुजबळ यांनी मांडला होता.

यासाठी काही लोकांनी आग्रह देखील धरला होता. मात्र, छगन भुजबळ यांचा हा प्रस्ताव आम्ही स्वीकारला नाही. कारण त्याच्या पुढचं जे पाऊल होतं ते आम्हाला कुणालाच मान्य नव्हतं.

भाजप सोबत जायला आमची संमती नव्हती. छगन भुजबळ यांनी देखील काल त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की, भाजपसोबत न जाण्याची आमची भूमिका होती. खोटं बोलून ते तिकडे गेले आहे. मी खोटं बोलत आहे, हे त्यांनी कबूल देखील केलं आहे.”

दरम्यान, राज्य सरकारने मुंबई पोलीस दलात कंत्राटी स्वरूपात 3000 जवानांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार ‘बाऊन्सर’ (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे.

गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का?? शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे.

हा आदेश कुणाच्या भल्यासाठी आणि कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला? शासनाला तीन हजार मनुष्यबळ हवे आहे तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यात येत नाही? मुंबई सारखे अतिसंवेदनशील शहर कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्यात कोणते शहाणपण आहे?

पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करणारे तरूण-तरुणी या शासनाला दिसत नाहीत का?त्यांचा हक्क का हिरावून घेतला जातोय? गृहमंत्र्यांनी याचे जनतेला उत्तर दिले पाहिजे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.