Ajit Pawar | “उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर…”; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्या समर्थकांना आपलाच नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं वाटत आहे.

याच पार्श्वभूमीवर जो तो आपल्या नेत्याबाबत विधान करताना दिसत आहे. अशात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केलं आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

If Devendra Fadnavis becomes Chief Minister, we have nothing to feel bad about – Ajit Pawar

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय वक्तव्य केलं आहे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे.

त्यांनी त्यांचं वक्तव्य केल्यानंतर बाकीचे आम्ही काय बोलणार? शेवटी जनता जनार्दन हा निर्णय घेणार आहे. उद्या जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर त्यात आम्हाला वाईट वाटायचं काहीच नाही.”

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे.

याबाबत अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून शरद पवारांनी खूणगाठ बांधली होती.” चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.