Share

Weather Update | नागरिकांनो सतर्क रहा! येत्या दोन दिवसात राज्यात परतीच्या पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. या महिन्यातील वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाल्याचे दिसत आहे. अशाच राज्यातून परतीच्या वाटेवर निघालेला पाऊस जाता जाता राज्यातील बहुतांश ठिकाणी कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. या महिन्यातील वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाल्याचे दिसत आहे.

अशाच राज्यातून परतीच्या वाटेवर निघालेला पाऊस जाता जाता राज्यातील बहुतांश ठिकाणी कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Rain has receded from most parts of the state including Vidarbha, Marathwada

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागातून पावसाने माघार घेतली आहे. मात्र, कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

त्यामुळे या परिसरातील आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावं, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील गारवा कमी झाला असून उन्हाचे चटके जाणवायला लागले आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी दुपारच्या वेळी तापमानाचा पारा 33 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचला आहे. तर किमान तापमानामध्ये 7 ते 8 अंश सेल्सिअस एवढी घट नोंदवण्यात आली आहे.

बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) सातत्याने केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही