Share

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस जेव्हा गृहमंत्री होतात, तेव्हा महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढते – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्द टीका केली होती. देवेंद्र फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला दुजोरा देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील देवेंद्र … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्द टीका केली होती. देवेंद्र फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला दुजोरा देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे अर्धसत्य बोलल्या आहेत. देवेंद्र फडणवीस जेव्हा गृहमंत्री होतात, तेव्हा महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढते, असा माझा आरोप आहे. सत्तेसाठी ते गुंडांना पाठीशी घालतात.

गुंडांचा वापर करून ते निवडणुका देखील लढवतात. गुंडांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास दिला जातो, जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात, तेव्हा या गोष्टी घडतात. ही दुर्दैवी बाब मला आज सर्वांना सांगावी लागत आहे.”

Home Affairs does not exist in the state – Sanjay Raut

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “राज्यात सध्या गृहखात अस्तित्वात नाही. कारण कृतीतून गृहमंत्री दिसावा लागतो. मात्र, सध्या गृहमंत्री फक्त विरोधकांना त्रास देताना दिसत आहे.

गृहमंत्री पोलीस यंत्रणा राजकीय कारणांसाठी वापरताना दिसत आहे. गृहमंत्री राज्यातील जनतेचा संरक्षण करताना दिसला पाहिजे. मात्र, आज तो दिसत नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही