Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवलयामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. केंद्र सरकार मार्फत या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाइन म्हणजेच विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.
125 vacancies will be filled
भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये उपक्षेत्र अधिकारी पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज सादर करण्याच्या पत्ता (Address for submission of application)
अवर सचिव आणि कार्यालय प्रमुख, नॅशनल ऑथॉरिटी केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन ( NACWC), कॅबिनेट सचिवालय, पहिला मजला, चाणक्य भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली- 21
केंद्र सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने वरील पत्त्यावर अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. अर्ज वेळेत न पोहोचल्यास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील.
या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1XvFjDFKoj2bfVUb_cl27pUN_Xgy4pibV/view
अधिकृत संकेतस्थळ (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | टोलाचा निर्णय होणार शिवतीर्थावर? राज ठाकरे आणि महायुतीच्या मंत्र्यांची बैठक सुरू
- Uddhav Thackeray | मोदी सरकार गेली काही वर्ष स्वतःचीच आरती ओवाळून घेतेय; ठाकरे गटाचं टीकास्त्र
- Weather Update | नागरिकांनो सतर्क रहा! येत्या दोन दिवसात राज्यात परतीच्या पावसाची शक्यता
- Ajit Pawar | “उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर…”; अजित पवार स्पष्टच बोलले
- Sharad Pawar | अजित पवार मुख्यमंत्री होणार, हे स्वप्न राहणार – शरद पवार