Raj Thackeray | दादा भुसे-राज ठाकरेंच्या बैठकीत सकारात्मक चर्चा; टोलाबाबत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांची शिवतीर्थावर बैठक पार पडली.

त्यांच्या या बैठकीमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत टोलाबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहे.

सरकारसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबई एन्ट्री पॉइंट्सवरील पाच टोलनाक्यांवर प्रथमोपचार आणि शौचालयाची सुविधा देण्यात येणार आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

First aid and toilet facilities will be provided at each toll

राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्यात टोल नाक्याच्या मुद्द्यावरून झालेल्या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. येत्या 15  दिवसांमध्ये सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकारसह मनसेचे कॅमेरे लावले जातील, म्हणजे प्रत्येक टोलावरून किती गाड्या जातात हे कळेल.

ही व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक टोलनाक्यावर प्रथमोपचार आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग यांचे आयआयटीकडून सर्वे केले जातील. टोल नाक्यासंबंधित समस्या नोंदवण्यासाठी प्रवाशांना एक तक्रार क्रमांक दिला जाणार आहे. तर येल्लो लाईनच्या पुढे गाड्यांची रांग लागली तर टोल घेतला जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

टोल नाक्यावर फास्टटॅग चालला नाही तर प्रवाशांना अनेकदा डबल पैसे भरावे लागतात. मात्र, आता प्रवाशांना पुन्हा पैसे भरण्याची गरज नाही. टोल नाक्यावर फास्टटॅग चालला नाही तर प्रवाशांना एकदाच पैसे भरावे लागतील.

टोल नाक्यावर किती पैसे बाकी आहे? आणि किती पैसे जमा झाले? या संबंधित मोठा बोर्ड लावला जाईल. ठाण्यामध्ये असलेल्या टोल नाक्यावर लोकांना दोन वेळा टोल भरावा लागतो.

तर ऐरोली येथे असलेल्या टोल नाक्यावर प्रवाशांना एकदाच टोल नाका भरावा लागेल, याबाबत शासन लवकरच जीआर काढले, असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.