Chitra Wagh | तुम्ही चमत्कार लिहायचं आणि बाबूमियाला ते बलात्कार वाटायचं; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती.

जेव्हा-जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात, तेव्हा-तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केली आहे.

What is my character? – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “राज्याच्या मोठ्ठया ताई (सुप्रिया सुळे), लक्षात आले असेल एव्हाना भारतीय जनता पार्टी व आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या विरोधात उगाच आणि बेताल वक्तव्य कराल तर अशीचं ठोक उत्तर यापुढेही मिळतील. ताई, स्वत: साळसूदपणाचा आव आणत कुणा बाबूमिया बलात्काऱ्याला तुम्ही लिहीलेल्या स्क्रीप्टचं वाचन करायला लावलतं.

मला तुम्हाला आणि तुमच्या चेल्याचपाट्यांना सांगायचंय मी काय आहे आणि माझं कॅरेक्टर काय आहे, हे आदरणीय शरद पवार साहेबांना विचारा बोली भाषेत म्हणायचं तर तुमच्या बापाला जाऊन विचारा म्हणजे, पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा तेचं तेच तुम्हाला बोलावं आणि कुणाला बोलायला लावायला लागणार नाही.

शेवटचा सल्ला : माझ्या टीकेने कितीही घायकुतीला आलात तरी तुमचे डायलॉग डीलीव्हरी करायला हा बाबूमिया बलात्कारी सारखी माणसं निवडणु नका हो त्याचा 3 इडीयट्स मधल्या चतुर रामलिंगम या कॅरेक्टरसारखं व्हायचं. तुम्ही लिहून द्यायचात चमत्कार आणि बाबूमियाला वाटायचं बलात्कार. तेव्हढी काळजी घ्या, बाकी चालू द्या तुमचं.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe