Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) टोलनाक्याच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीदरम्यान या मुद्द्यावर तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी काही मोठे निर्णय घेतले आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाइड क्राफ्ट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे महाराष्ट्राच्या लोकांची फसवणूक करत असल्याचं क्लाईड क्रास्टो यांनी म्हटलं आहे.
Raj Thackeray and Devendra Fadnavis talk and act as scripted – Clyde Crasto
ट्विट करत क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) म्हणाले, “श्री राज ठाकरे यांचे नुकतेच झालेल ‘टोल मुक्त आंदोलन’ म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी “तू मारल्या सारखं कर, मी रडल्या सारखं करतो” करार.
स्क्रिप्ट लिहिल्या प्रमाणे बोलणे आणि वागणे. महाराष्ट्रच्या लोकांची फसवणूक दोघेही करीत आहेत.” क्लाईड क्रास्टो यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, टोल नाक्याच्या मुद्द्यावरून आज मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोघांत सकारात्मक चर्चा झाली आहे.
येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकारसह मनसेचे कॅमेरे लागतील, ही व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होणार. त्याचबरोबर भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल यांचे आयआयटीकडून सर्वे केले जातील.
प्रत्येक टोलनाक्यावर शौचालय आणि प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध केली जाणार. तर येलो लाईनच्या पुढे गाड्यांची रांग लागल्यावर टोल घेतला जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | तुम्ही चमत्कार लिहायचं आणि बाबूमियाला ते बलात्कार वाटायचं; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं
- MLA Disqualification | आमदार अपात्रतेसंबंधित सुनावणीचे वेळापत्रक 17 ऑक्टोबरपर्यंत द्या; सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्षांना आदेश
- Ajit Pawar | शरद पवार गटाला मोठा झटका! अजित पवारांकडून सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल
- Eknath Shinde | शिंदे गटाचं ठरलं! यंदा आझाद मैदानावर होणार दसरा मेळावा
- Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस जेव्हा गृहमंत्री होतात, तेव्हा महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढते – संजय राऊत