Bacchu Kadu | मंत्रालयातील सहा मजले सुधारले तर संपूर्ण महाराष्ट्र सुधारेल; बच्चू कडूंची राज्य सरकारवर खोचक टीका

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Bacchu Kadu | वर्धा: दिव्यांगासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वर्धा येथील सेवाग्राम येथे दिव्यांगांच्या दारी अभियान राबवलं जात आहे.

या अभियानाची सुरुवात आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते झाली आहे. या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या ठिकाणी बसतात, तिथेच सगळा गोंधळ असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

There is no point in building a big house – Bacchu Kadu

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “मंत्रालयामध्ये सगळी चिरीमिरी सुरू आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सगळं पाणी मुरत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव ज्या ठिकाणी बसतात, त्या ठिकाणी सगळा गोंधळ आहे.

त्यामुळे मंत्रालयामधील सहा मधले सुधारले तर आपला अख्खा महाराष्ट्र सुधारू शकतो. नुसती घर मोठी बांधण्यात काही अर्थ नाही. त्यामध्ये राहणारी माणसं देखील मोठी पाहिजे.”

दरम्यान, राज्यातील टोल नाक्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रकरणावरून आक्रमक झाले होते.

त्यानंतर राज ठाकरे यांनी दादा भुसे यांची भेट घेऊन टोलाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणीसांवर खोचक शब्द टीका केली आहे.

ट्विट करत क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) म्हणाले, “श्री राज ठाकरे यांचे नुकतेच झालेल ‘टोल मुक्त आंदोलन’ म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी “तू मारल्या सारखं कर, मी रडल्या सारखं करतो” करार. स्क्रिप्ट लिहिल्या प्रमाणे बोलणे आणि वागणे. महाराष्ट्रच्या लोकांची फसवणूक दोघेही करीत आहेत.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe