Weather Update | राज्यातून परतीचा पाऊस अखेर मागे फिरला, ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढणार

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरण सध्या बदलताना दिसत आहे. यंदा परतीचा पाऊस नियोजित वेळेपूर्वीच माघारी फिरताना दिसला आहे.

10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून परतीचा पाऊस माघारी फिरण्याची घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर कोकण आणि विदर्भ वगळता उर्वरित राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती.

यानंतर आता विदर्भातूनही परतीचा पाऊस माघारी फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात नागरिकांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागणार आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा बघता, हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

The temperature has reached between 33 and 35 degrees Celsius

गेल्या 13 वर्षांमध्ये राज्यातून 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस परतला आहे. मात्र, यंदा परतीच्या पावसाने राज्यातून लवकर पाय काढला आहे. यावर्षी पहिल्यांदा नियोजित तारखेपूर्वी पाऊस परतला आहे.

पाऊस माघारी फिरल्यानंतर उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी दुपारच्या वेळी तापमानाचा पारा 33 ते 35 अंश सेल्सियस दरम्यान पोहोचला आहे. तर किमान तापमानात 7 ते 8 अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून सातत्याने केली जात आहे.

दरम्यान, अरबी समुद्रामध्ये 14 ऑक्टोबर रोजी चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या चक्रीय स्थितीमुळे हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांवर परिणाम होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे.

राज्यावर देखील या चक्रीय स्थितीचा परिणाम होणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुणे शहरात 14 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून बदल होण्यास सुरू होऊ शकतो, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe