Share

Maratha Reservation | मनोज जरांगे आक्रमक; सरकार पुढे ठेवल्या ‘या’ मागण्या

🕒 1 min read Maratha Reservation | जालना: मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आज भगवं वादळ आलं आहे. जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भव्य सभा सुरू आहे. या सभेदरम्यान त्यांनी राज्य सरकार समोर काही मागण्या ठेवल्या आहेत. Related News for Youविधान परिषदेत घोडेबाजार? सुप्रिया … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | जालना: मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आज भगवं वादळ आलं आहे.

जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भव्य सभा सुरू आहे. या सभेदरम्यान त्यांनी राज्य सरकार समोर काही मागण्या ठेवल्या आहेत.

The government should give reservation to the Maratha community within 10 days – Manoj Jarange

या सभेमध्ये बोलत असताना मनोज जरांगे यांनी शासनापुढे काही मागण्या ठेवल्या आहे. मनोज जरांगे म्हणाले, “सरकारने मराठा समाजाला दहा दिवसांमध्ये आरक्षण (Maratha Reservation) घ्यावं.

त्याचबरोबर राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रत्येक मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश करावा. सारथी योजनेच्या माध्यमातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने जास्तीत जास्त निधी देऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे.

तर कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी. ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा दर दहा वर्षाला सर्वे व्हावा. अद्याप सर्वे झालेला नाही. हा सर्वे करून प्रगत जाती बाहेर काढाव्या.”

दरम्यान, या सभेपूर्वी जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “आमच्या या सभेसाठी मराठा समाज शांततेने आला आहे आणि शांततेने घरी जाणार आहे.

मराठा समाज आज राज्य आणि देशाला नाही तर जगाला शांततेचा संदेश देणार आहे. सरकारकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी आणखी दहा दिवस आहे.

आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण (Maratha Reservation) मिळालं पाहिजे. आमच्या सामान्य मराठ्यांची ही लढाई आम्हाला जिंकायची आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही