Maratha Reservation | मराठ्यांच्या आरक्षणावरून मनोज जरांगेंची जाहीर सभा; जरांगेंची मुलगी म्हणाली…

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | जालना: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन सुरू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मनोज जरांगे यांची जाहीर सभा सुरू आहे.

या सभेसाठी लाखो मराठा बांधवांनी गर्दी केली आहे. तर मनोज जरांगे यांची लेक देखील या सभेसाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाली आहे. यावेळी मनोज जरांगे यांच्या मुलीनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

मनोज जरांगे यांची मुलगी म्हणाली, “मराठा बांधवांना आरक्षण (Maratha Reservation) मिळेल, अशी मला आशा वाटत आहे. सरकारने आम्हाला लवकरात लवकर आरक्षण घ्यावं.

10 दिवसानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर त्याबाबत मराठा समाज आणि माझे बाबा (मनोज जरांगे) त्यांची भूमिका मांडतील.

सरकारने आम्हाला पुढची भूमिका घ्यायला लावू नये. 40 दिवस पूर्ण होण्याआधी सरकारने आम्हाला आरक्षण घ्यावं. सध्या बाबा घरात नसतात. तर दुसरीकडे मराठा समाजाला देखील लवकर आरक्षण मिळत नाहीये.

त्यांना सभा वगैरे घ्यायला लागत आहे. त्यामुळे घरात वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेन, अशी सर्व मराठा बांधवांना आशा आहे. म्हणून ते आज या सभेसाठी जमले आहेत.”

The government should give reservation to the Maratha community within 10 days – Manoj Jarange

दरम्यान, या सभेमध्ये बोलत असताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या आहे. “ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा दर दहा वर्षाला सर्वे व्हावा.

या सर्वेच्या माध्यमातून प्रगत जाती बाहेर काढाव्या. त्याचबरोबर राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रत्येक मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश करावा.

कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी. तर सरकारने मराठा समाजाला दहा दिवसांमध्ये आरक्षण (Maratha Reservation) घ्यावं”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe