Share

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे अचानक पुढारी झालेय; जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज अंतरवाली सराटी या गावात जाहीर सभा घेतली. सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दहा दिवसात निर्णय घ्यावा नाही तर मोठं आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी शासनाला दिला आहे. या सभेपूर्वी मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी अजित पवार … Read more

Published On: 

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज अंतरवाली सराटी या गावात जाहीर सभा घेतली.

सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दहा दिवसात निर्णय घ्यावा नाही तर मोठं आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी शासनाला दिला आहे.

या सभेपूर्वी मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर खोचक टीका केली होती.

छगन भुजबळ आणि त्यांच्या वयाचा ताळमेळ लागत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. जरांगे यांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना छगन भुजबळ म्हणाले, “माझ्या बोलण्याने मराठा समाजात फूट पडेल, एवढा काही मराठा समाज नादान, अशिक्षित, किंवा संस्कृत नाही. मी काय खाल्लं याबाबत जरांगे बोलत आहे.

सध्या जरांगे कुणाचं खात आहे? याबद्दल देखील त्यांनी बोलावं. आधी त्यांची परिस्थिती काय होती आणि आता काय आहे? याबाबत त्यांनी भाष्य करावं. ते त्यांच्या संस्कृतीप्रमाणे बोलतात. ती त्यांची वैयक्तिक संस्कृती आहे.

ही संस्कृती समाजाची नाही, कारण समाज सुसंस्कृत आहे. हे जे अचानक पुढारी झालेले आहे, त्यांचा आरक्षणाबाबतचा अभ्यास, त्यांचं शिक्षण त्यांची संस्कृती याचा परिणाम त्यांच्या भाषणात होतं असतो. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही, मी देखील लक्ष देत नाही.

The subject of Chhagan Bhujbal has become very chiller now – Chhagan Bhujbal

दरम्यान मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. “छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते एकाच बाजारातले आहे. त्यांच्याविषयी मी जास्त बोलू इच्छित नाही.

त्याचबरोबर छगन भुजबळ यांचा विषय आता अत्यंत चिल्लर झाला आहे. एखाद्या लहान मुलाप्रमाणे बडबडत असतात. त्यांचा आणि त्यांच्या वयाच्या ताळमेळ बसत नाही.

कारण एवढ्या मोठ्या माणसाला या प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही