Share

Uddhav Thackeray | ‘समृद्धी’ अपघात आणि शोक दृष्टचक्र कधी थांबणार? ठाकरे गटाचा राज्य सरकारवर सवाल

🕒 1 min readUddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या आगर सायगावात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ‘समृद्धी’ अपघात आणि शोक दृष्टचक्र कधी थांबणार? असावा ठाकरे गटानं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या आगर सायगावात भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ‘समृद्धी’ अपघात आणि शोक दृष्टचक्र कधी थांबणार? असावा ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

समृद्धी महामार्गावरील प्रवास म्हणजे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार ठरत आहे. डिसेंबर 2022 मध्ये या महामार्गाचे उद्घाटन झाले, तेव्हापासून मागील नऊ महिन्यांत ‘समृद्धी’वर चारशे-साडेचारशे छोटे-मोठे अपघात झाले आहेत.

त्यातील बळींची संख्या दीडशेपेक्षा जास्त आहे. सरकार मात्र फक्त शोक व्यक्त करणे आणि आर्थिक मदतीचे आकडे जाहीर करणे एवढेच करीत आहे.

हा ‘मृत्यू महामार्ग’ का बनला आहे, राज्याची समृद्धी होण्याऐवजी अपघातांची ‘समृद्धी’ का होत आहे, याचा आता तरी गांभीयाने शोध घ्या, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

महाराष्ट्रात ‘घटस्थापना होत असताना समृद्धी महामार्गावर अपघात घडला व 12 प्रवाशांचे बळी गेले. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर- अगरसायगाव महामार्गावर हा अपघात महला समृद्धी महामार्ग लोकांची सोय कवी म्हणून बनवला की लोकांना असे निर्घुण मरण यावे म्हणून बनवला?

असा एकही दिवस जात नाही की समृद्धी महामार्गावर अपघात घडला नाही अशी बातमी येत नाही. शनिवारी मध्यरात्री सैलानी बाबांच्या दर्शनावरून परतणारया भाविकांची टेम्पो ट्रव्हलर एका ट्रकला पाठीमागून धडकली.

त्यात 12 जणांचा बळी गेला हे सर्व मृत्यू जागीच झाले पुढे धावणारा ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने मागे असलेली टेम्पो ट्रॅव्हलर त्यावर जोरात धडकली, असे सांगण्यात येत आहे.

असेही सांगितले गेले की, या ट्रकचा पाठलाग आरटीओची गाड़ी करीत होती त्यातून ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला आणि हा अपघात झाला हे जर खरे असेल तर ट्रकचा पाठलाग का होत होता?

या प्रश्नाचे उत्तर याअपघाताबद्दल शोक व्यक्त करणारा सरकारने दिले पाहिजे. सरकारने जरूर शोक व्यक्त करावा, पण ट्रक आणि आरटीओ पाठलाग हे कोडेही जनतेला सोडवून सांगावे हा पाठलाग असेल अथवा नसेल, पण समृद्धी महामार्गावरील प्रवाशांचा पाठलाग ‘यमदूत’ मात्र नक्कीच करीत आहे.

गेल्या वर्षभरात या महामार्गावर झालेले अपघात आणि दुर्घटना, त्यातील बळींची मोठी संख्या हेच सिद्ध करते. समृद्धी महामार्गावरील प्रवास म्हणजे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार ठरत आहे डिसेंबर 2022 मध्ये या महामार्गाचे उद्घाटन झाले, तेव्हापासून मागील नऊ महिन्यात ‘समृद्धी’वर चारशे साडेचारशे छोटे-मोठे अपघात झाले आहेत.

त्यातील बळींची संख्या दीडशेपेक्षा जास्त आहे. सरकार मात्र फक्त शोक व्यक्त करणे आणि आर्थिक मदतीचे आकडे जाहीर करणे एवढेच करीत आहे.

हा ‘मृत्यू महामार्ग का बनला आहे, राज्याची समृद्धी होण्याऐवजी अपघातांची ‘समृद्धी’ का होत आहे, याचा आता तरी गाभीयनि शोध घ्या दोनच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरजवळील या महामार्गाचा काही भाग सुमारे पाच इंच जमिनीखाली खचल्याची बातमी फोटोसह प्रसिद्ध झाली.

दर्जा आणि गुणवत्तेबाबत छातीठोकपणे खात्री दिल्या गेलेल्या महामार्गाची ही अवस्था का व्हावी? या भागात महामार्गावर धावणारी वाहने मध्येच ‘जन्म घेतात असेही काहीचे म्हणणे आहे. ते जर खरे असेल तर त्यामुळे ‘समृद्धी’च्या पद्धतीवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह

अधिक गडद होणार आहे. ‘गेम चेंजर’ वगैरे म्हटल्या गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या गुणवत्तेबाबत, बांधकाम पद्धतीबाबत अनेक शंका, असंख्य आक्षेप घेतले गेले. मागील दहा महिन्यांतील प्रत्येक अपघाताने या शंका, आक्षेप खरेच ठरविले.

त्यात आता शनिवारी मध्यरात्री वैजापूरजवळील भीषण अपघाताची भर पडली. आणखी किती अपघात होऊ देणार आहात? अपघात आणि त्यातील बळी यांबाबत फक्त सहवेदना प्रकट करून आर्थिक मदत जाहीर केल्याने समृद्धी महामार्गावरील अपघात व अपघाती बळींचे दुष्टचक्र थांबणार नाही.

शनिवारी रात्री झालेल्या अपघाताबद्दल आता पंतप्रधानांनीही शोक प्रकट केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही दुख व्यक्त केले.

हा सरकारी सोपस्कार ठीक आहे, मात्र हे अपघातग्रस्तांच्या दुर्दैवी मृत्यूंचे खरे प्रायश्चित्त नाही. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱया अपघातांवरून ज्या शंका आणि आक्षेप घेतले गेले आहेत त्याबाबत राज्य सरकारने कोणती पावले उचलली आहेत?

‘समृद्धी’, अपघात आणि शोक हे दुष्टचक्र कधी थांबणार? शनिवारच्या अपघातात हकनाक मरण पावलेल्या 12 भाविकांच्या शोकसंतप्त आत्म्यांचे हे सवाल आहेत. या महामार्गाला स्वतचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणवून घेणारयांकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?

सौजन्य – सामना

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!