Share

Bacchu Kadu | बच्चू कडू जाणार अयोध्या दौऱ्याला; श्रीरामाला करणार कापूस, सोयाबीन अर्पण

🕒 1 min read Bacchu Kadu | अकोला: प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी ‘मेरा देश मेरा खून’ या मोहिमेचं आयोजन केलं आहे. या मोहिमेच्या निमित्ताने बच्चू कडू आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. एका विशेष उद्देशाने बच्चू कडू यांनी ही मोहीम सुरू केली आहे. देशातील सैनिक आणि शेतकऱ्यांमध्ये राष्ट्रवाद प्रस्थापित करणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bacchu Kadu | अकोला: प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी ‘मेरा देश मेरा खून’ या मोहिमेचं आयोजन केलं आहे. या मोहिमेच्या निमित्ताने बच्चू कडू आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. एका विशेष उद्देशाने बच्चू कडू यांनी ही मोहीम सुरू केली आहे.

देशातील सैनिक आणि शेतकऱ्यांमध्ये राष्ट्रवाद प्रस्थापित करणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. बच्चू कडू यांच्या या मोहिमेकडे संपूर्ण राज्यसह देशाचं लक्ष लागलं आहे.

Bacchu Kadu will be touring Uttar Pradesh on October 29 and 30

प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना राष्ट्रीय किसान क्रांती दलाचे अमरेश मिश्रा आणि राम तिवारी यांनी उत्तर प्रदेश दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे.

त्यांच्या निमंत्रणाचा मान राखत बच्चू कडू 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर असणार आहे. त्यांच्या या दौऱ्यात उत्तर प्रदेशचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहे. तर या दौऱ्यादरम्यान बच्चू कडू अयोध्येला देखील भेट देणार आहे.

अयोध्या दौऱ्यादरम्यान बच्चू कडू प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार आहे. या दर्शनात प्रभू श्रीरामांना उसाची मोळी, सोयाबीन, कापूस इत्यादी गोष्टी अर्पण करून बच्चू कडू शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रार्थना करणार आहे.

दरम्यान, 15 ऑक्टोबर 2023 रोजी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मुंबईतील सीएसएमटी समोरील मंगल गडिया आणि सय्यद हुसेन या शहीद स्मारकास वंदन करून ‘मेरा देश मेरा खून’ या मोहिमेची घोषणा केली.

या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी दोन दिवस उत्तर प्रदेशचा दौरा करतील. या दौऱ्यादरम्यान ते अयोध्येला भेट देणार आहे.

त्याचबरोबर ते राजकुमार पटेल, राम तिवारी, अमरेश मिश्रा यांच्यासह प्रथम हनुमानगडीला देखील जाणार आहे. बच्चू कडू यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही