🕒 1 min read
Sharad Pawar । मागील पाच वर्षांपासून देशाच्या राजकारणात अनेक मोठं-मोठ्या उलथापालथी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकारणात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. सध्या अशीच एक खळबळजनक बातमी राजकीय गोटातून समोर येत आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपसोबत (BJP) जाणार असल्याचा दावा प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
“ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपासोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजपा बघत आहे. त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचा प्रामुख्याने विचार आहे,” असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे खरोखरच भाजपसोबत जाणार का? असा सवाल सर्वांच्या मनात पडला आहे. जर हे दोन्ही नेते भाजपसोबत गेले तर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.
Bachu Kadu claims
कायम भाजपवर टीका करणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जर त्यांच्यासोबत केंद्रात गेले तर राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः महाविकास आघाडीत कोणता भूकंप होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Walmik Karad ची होणार सुटका? कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
- ‘तो’ पुरावा समोर येताच Manoj Jarange आक्रमक, म्हणाले; “धनंजय मुंडेंच्या टोळीने…”
- Walmik Karad आणखी गोत्यात, पोलिसांच्या हाती लागले ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










