Walmik Karad । SIT कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार 11 डिसेंबरला दिली होती.
वाल्मिक कराडची आज SIT कोठडी संपणार असून आज बीड कोर्टात त्याच्यावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आज वाल्मिक कराड याला जामीन मंजूर होणार की त्याच्या कोठडीत आणखी वाढ होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कालच खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ (Walmik Karad CCTV Footage Viral) समोर असून त्यामध्ये वाल्मिक कराड पाहायला मिळत आहे. या सीसीटीव्ही व्हिडिओमुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत भर पडली आहे.
Court hearing on Walmik Karad bail
महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड इतर आरोपींसोबत दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी आवाजाचे नमुने घेतले होते. अशातच आता हा व्हिडीओ महत्त्वाचा दुवा समजला जात आहे. या व्हिडीओमुळे त्याचा जामीन अर्ज रद्द होणार की नाही? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :