Manoj Jarange । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधत आहेत. अशातच अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मकोका लागलेले सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये असल्याचे सीसीटीव्ही पुरावे समोर आले आहेत.
यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. ” काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेंच्या टोळीने आणली आहे. एका जागेवर बसून खंडणी मागायचा आणि खून करायचा जर कट शिजवण्यात येतो. एक मंत्री संघटित गुन्हेगारीला पाठबळ देतो. खंडणी मागणारे आणि आरोपी हे एकच आहे,” असा दावा जरांगे यांनी केला आहे. (Manoj Jarange vs Dhananjay Munde)
पुढे ते म्हणाले की, “खंडणी मागायला लावणारी वेगळी टीम, खून करायला लावणारी वेगळी टीम आणि हे सर्व करून घेणार म्होरक्या अशा तीन टीम या गुन्ह्यात आहेत. खंडणी मागणारा पेक्षा सामूहिक कट रचणारा सर्वात मोठा गुन्हेगार असून तो आता मुख्य आरोपी झाला पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
दरम्यान, आता जरांगे यांच्या टीकेला धनंजय मुंडे प्रत्युत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तसेच समोर आलेल्या CCTV ने खळबळ उडाली आहे. वर आता राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :