🕒 1 min read
Walmik Karad । मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही पोलिसांना एका फरार आरोपीला पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे.
संतोष देशमुख कुटुंबीय त्यांना न्याय मिळावा यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. अशातच आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. सध्या खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ (Walmik Karad CCTV Footage Viral) समोर असून त्यामध्ये वाल्मिक कराड पाहायला मिळत आहे.
या सीसीटीव्ही व्हिडिओमुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत भर पडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड इतर आरोपींसोबत दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी आवाजाचे नमुने घेतले होते. अशातच आता हा व्हिडीओ महत्त्वाचा दुवा समजला जात आहे.
Walmik Karad CCTV Footage
दरम्यान, सध्या पोलीस कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर लवकरच सुनावणी पार पडणार आहे. पण त्यापूर्वीच खंडणीच्या दिवशीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे त्याचा जामीन अर्ज रद्द होणार की नाही? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- सैफ आणि करिनाचा ‘तो’ फोटो पाहून Shatrughan Sinha यांच्यावर वर भडकले नेटकरी, म्हणाले; “लाज वाटली पाहिजे…”
- Maharashtra politics । “पालकमंत्री काय असतो दाखवतो, बांगड्या भरा साल्यानो”; शिंदे गटाचे दोन बडे नेते आपापसात भिडले
- टीम इंडियाच्या Vaishnavi Sharma ने मलेशियाला धु धु धुतले, ५ धावा देत मिळवल्या ५ विकेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










