Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समाजवादावरून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंवर खोचक टीका केली आहे.
भारतीय जनता पक्षाला सत्ता देण्याचं काम समाजवादी नेत्यांनी केलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
समाजवाद्यांनी दंड फुगवून जे दावे केले नाहीत, ते संजय राऊत करू लागले आहेत, असं केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी म्हटलं आहे.
ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, “शून्यांची बेरीज, आपल्या ताकदीची आणि क्षमतेची प्रामाणिक जाणीव असलेल्या कोणासही अवास्तव विधाने करण्याची हिंमत होत नसते. म्हणूनच समाजवाद्यांनी दंड फुगवून जे दावे केले नाहीत, ते संजय राऊत करू लागले आहेत.
जे समाजातूनच बेदखल झाले, त्यांना डोक्यावर घेऊन एकाकी ठाकरे गटाच्या ओझ्यात भर घालताना राऊत यांना आनंदाच्या ज्या उकळ्या फुटत आहेत, ते पाहता आता उरलासुरला पक्ष समाजवादी गटात विसर्जित करायची वेळ आल्याचे स्पष्ट होते.”
Does Eknath Shinde even know the word socialism? – Sanjay Raut
दरम्यान, संजय राऊत यांनी समाजवादावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजवाद हा शब्द तरी माहित आहे का? त्यांना समजवादाची व्याख्या माहित आहे का?
बाळासाहेब ठाकरे यांचे पाईप म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी नेत्यांचे संबंध काय होते? ते विचारा. त्यावेळी समाजवादी नेते आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांवर टीका करायचे.
मात्र, महाराष्ट्राच्या भल्यासाठी ते नेहमी एकत्र यायचे. एकनाथ शिंदे ज्या भाजपच्या पदराखाली जाऊन बसले आहे, त्या भाजपला सत्ता देण्याचं काम समाजवादी नेत्यांनी केलं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Shambhuraj Desai | शरद पवार गटाचा मोठा नेता राज्य सरकारसोबत येणार? शंभूराज दसाईंचं मोठं वक्तव्य
- Sudhir Mungantiwar | बच्चू कडूंच्या टीकेला मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती”
- Govt Job Opportunity | SSC मार्फत नोकरीची संधी! ‘या’ विभागात भरती प्रक्रिया सुरू
- Nitesh Rane | मनोज जरांगेंना जास्त अभ्यास करण्याची गरज – नितेश राणे
- Ashish Shelar | बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राने काय करुन दाखवलं? आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार