Shambhuraj Desai | शरद पवार गटाचा मोठा नेता राज्य सरकारसोबत येणार? शंभूराज दसाईंचं मोठं वक्तव्य

Shambhuraj Desai | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.

अशात शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार गटातील मोठा नेता शिंदे-फडणवीस सरकारसोबत येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

Cabinet will be expanded soon – Shambhuraj Desai 

राज्य मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “राज्य शासनामध्ये सामील होण्यासाठी शरद पवार गटातील अनेक नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत आहे.

त्यामुळे कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागत असावा. परंतु, लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होईल. दसरा, दिवाळीमध्ये अनेक प्रकारचे धमाके होत असतात. मात्र, यावेळी दिवाळीत मोठा धमाका होणार आहे.”

दरम्यान, शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार गटातील काही नेते खरंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

शंभूराजे देसाई यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कोणता बडा नेता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहे? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.