Vijay Wadettiwar | भाजपसाठी अजित पवार म्हणजे फक्त युज अँड थ्रो – विजय वडेट्टीवार

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक शब्दात अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवार कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Ajit Pawar can never become Chief Minister – Vijay Wadettiwar

प्रसार माध्यमांशी बोलत असताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “आता सगळं संपलं आहे. अजित पवार आता जर महाविकास आघाडीत असते, तर ते कदाचित मुख्यमंत्री झाले असते.

परंतु, महाविकास आघाडीतून बाहेर गेल्यावर त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. वापरा आणि फेकून द्या (युज अँड थ्रो) हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे.

अजित पवारांना कधी युज करायचं आणि कधी त्यांचा थ्रो करायचं याचं वेळापत्रक भाजपने तयार करून ठेवलं आहे. अजित पवार यांची स्वप्न स्वप्नच राहणार आहेत. त्याचबरोबर ते कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही, हे निश्चित आहे.”

दरम्यान, हा सर्व वादविवाद सुरू असताना शंभूराज देसाई यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “शरद पवार गटातील काही नेते राज्य सरकारमध्ये सामील होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत आहे.

त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला कदाचित वेळ लागत असावा. दसरा, दिवाळीमध्ये विविध प्रकारचे धमाके होतात. मात्र, यंदा दिवाळीत मोठा धमाका होणार आहे.”

शंभूराजे देसाई यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कोणता बडा नेता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहे? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe