Share

MPSC Recruitment | मेगाभरती अपडेट! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू

🕒 1 min read MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एमपीएससीच्या भरतीची वाट बघत असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission)  यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं आहे. Related News for YouMPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ऑनलाइन परीक्षा 2027 पर्यंत लांबणीवरपहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद; अभिमन्यू पवारांना … Read more

Published On: 

🕒 1 min read

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एमपीएससीच्या भरतीची वाट बघत असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission)  यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं आहे.

एमपीएससीमार्फत या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

7510 Vacancies to be filled

एमपीएससी यांच्यामार्फत मेगा भरती राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 7510 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

यामध्ये दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादक शुल्क विभाग – 06, तांत्रिक सहाय्यक – 01, कर सहाय्यक – 468 आणि लिपिक टंकलेखक – 7035 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात. या भरती प्रक्रियेतील मुख्य परीक्षा 17 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://mpsc.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://mpsc.gov.in/downloadFile/english/7852

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.mpsc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही