Imtiaz Jaleel | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा – इम्तियाज जलील

Imtiaz Jaleel | मुंबई: समृद्धी महामार्गाचं उद्घाटन जेव्हापासून झालं आहे, तेव्हापासून त्या ठिकाणी भीषण अपघात होताना दिसत आहे. अशात समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या आगर सायगावात भीषण अपघात झाला.

याच पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, असं इम्तियाज झालेली यांनी म्हटलं आहे.

The price of human life has become cheap – Imtiaz Jaleel

प्रसार माध्यमांशी बोलत असताना इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, “समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

माणसाच्या जीवाची किंमत अत्यंत स्वस्त झाली आहे. त्यामुळे मुंबईत बसून नुसत्या घोषणा करणं अत्यंत अयोग्य आहे. सरकारने अपघात स्पॉट निश्चित केलं पाहिजे.

त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटानं देखील राज्य सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. ‘समृद्धी’ अपघात आणि शोक दृष्टचक्र कधी थांबणार? असावा ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

समृद्धी महामार्गावरील प्रवास म्हणजे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार ठरत आहे. डिसेंबर 2022 मध्ये या महामार्गाचे उद्घाटन झाले, तेव्हापासून मागील नऊ महिन्यांत ‘समृद्धी’वर चारशे-साडेचारशे छोटे-मोठे अपघात झाले आहेत.

त्यातील बळींची संख्या दीडशेपेक्षा जास्त आहे. सरकार मात्र फक्त शोक व्यक्त करणे आणि आर्थिक मदतीचे आकडे जाहीर करणे एवढेच करीत आहे.

हा ‘मृत्यू महामार्ग’ का बनला आहे, राज्याची समृद्धी होण्याऐवजी अपघातांची ‘समृद्धी’ का होत आहे, याचा आता तरी गांभीयाने शोध घ्या, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.