Shivsena | ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ, शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर

Shivsena | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.

एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या चिन्ह आणि नावावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला.

या सर्व घटनानंतर ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी 31 ऑक्टोबर 2023 रोजी होणार होती. मात्र, आता पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे.

शिवसेनेची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी 31 ऑक्टोबरला होणार होती. मात्र, ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

ही सुनावणी आता दिवाळीनंतर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या माहितीनंतर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Rahul Narwekar is making Timepass web series – Sanjay Raut

दरम्यान, शिवसेना अपात्र आमदारांच्या सुनावणीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर खूप वेळ लावत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

“विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर टाइमपास 1, टाईमपास 2, टाईमपास 3 वेब सिरीज बनवत आहे. सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना निर्णय लवकर घेण्याचे वारंवार आदेश देत आहे.

शिंदे आणि त्यांचे आमदार चोर आणि लफंगे आहेत. विधानसभा अध्यक्ष या चोरांना संरक्षण देण्याचं काम करत आहे. सध्या राहुल नार्वेकर चोरांचे सरदार झाले आहे. ते सध्या संविधान आणि कायदा मानायला तयार नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.