Share

Govt Job Opportunity | शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी राज्य शासन नेहमी विविध भरती प्रक्रिया राबवत असते. अशात सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी राज्य शासन नेहमी विविध भरती प्रक्रिया राबवत असते. अशात सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात.

2109 vacancies will be filled

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 2109 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

http://mahapwd.com/News/Newslist/Default.htm

दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1KUJ89frHoDqArfIUR_Kc5XjNQcOQX9b7/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

http://www.mahapwd.com/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install