Government Scheme | शेतकरी सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळवू शकतात आर्थिक मदत

Government Scheme | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देण्याचा प्रयत्न करते.

यामध्ये प्रधानमंत्री किसान योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. या योजनांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

प्रधानमंत्री किसान योजना (Pradhan Mantri Kisan Yojana)

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये देते. हे पैसे दोन हजार रुपयांच्या प्रत्येकी तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात.

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पीएम किसान पोर्टल वर जाऊन, यासाठी नोंदणी करू शकतात. त्याचबरोबर या योजनेची संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकवर संपर्क साधू शकतात.

प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Pik Bima Yojana)

नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीड इत्यादी गोष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागते. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्यांचे हे नुकसान भरून काढू शकतात.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देते. या योजनेसाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागतो. या हप्त्यानुसार शेतकरी अनुदान देते.

केंद्र आणि राज्य सरकार 50:50 च्या प्रमाणात विनाअनुदानित पिकांसाठी प्रीमियम सबसिडी शेअर करतात.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana)

केंद्र सरकारच्या या योजनेमार्फत सरकार दर महिन्याला शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन देते. या योजनेसाठी फक्त 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात.

जेव्हा शेतकऱ्यांचं वय 60 वर्षे पूर्ण होईल तेव्हा त्यांच्या खात्यातून दर महिन्याला त्यांना तीन हजार रुपये पेन्शन म्हणून पाठवले जातात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.