Maratha Reservation | मनोज जरांगे आक्रमक; पुण्यात घेणार जाहीर सभा

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) फक्त उपोषणच नाही तर राज्यभर सभा देखील घेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यामध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला दहा … Read more

Published On: 

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) फक्त उपोषणच नाही तर राज्यभर सभा देखील घेत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यामध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला दहा दिवस दिले आहे.

24 ऑक्टोबरनंतर सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन करू, असा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. अशात आता मनोज जरांगे पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

On October 20, 2023, Manoj Jarange will hold a meeting in Pune district

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहेत. अंतरवाली सराटीनंतर ते पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी मनोज जरांगे यांची पुणे जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे. राजगुरुनगर येथे ही सभा होणार. मराठा क्रांती मोर्चाने या सभेचं आयोजन केलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या सभांना लाखो संख्येने गर्दी होत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात होणाऱ्या सभेला पाच लाख मराठा बांधव येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर सभेसाठी शंभर एकर जागा निवडण्यात आली आहे. या जागेची पाहणी आणि व्यवस्था मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलिसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही