Rahul Narwekar | संजय राऊतांना स्वस्त प्रसिद्ध प्राप्त करण्याची जुनी सवय – राहुल नार्वेकर

Rahul Narwekar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे, तरी देखील राहुल नार्वेकर निर्णय घ्यायला वेळ लावत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut is not the President of India – Rahul Narwekar

राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, “नियमबाह्य आणि घटनाबाह्य नक्की काय कृत्य झालं आहे? हे आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला याबद्दल स्पष्टता प्राप्त होईल.

निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी संजय राऊत बिनबुडाचे आरोप करत आहे. संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करून घेण्याची जुनी सवय आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणं, उत्तम उपाय आहे.

या व्यक्तींबद्दल बोलून आपण त्यांना महत्त्व का द्यावं. संजय राऊत काही भारताचे राष्ट्रपती नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देत नाही.”

दरम्यान, संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. “अपात्र आमदार प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घ्या, असं सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांची नियुक्ती घटनात्मक पद्धतीने झालेली नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. एवढं सगळं होऊन देखील विधानसभा अध्यक्ष निर्णय लवकर घेत नाही.

ते सध्या टाईमपास वेब सिरीज बनवत आहे. शिंदे आणि त्यांच्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष संरक्षण देत आहे. ते सध्या चोरांचे सरदार झालेले आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.