Weather Update | कुठं ढगाळ वातावरण, तर कुठं उन्हाचा चटका कायम; पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातून मान्सून माघारी फिरताना दिसत आहे. मान्सून माघारी फिरत असताना राज्यभरात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढताना दिसत आहे.

उन्हाच्या झळा आणि वाढत्या उकडामुळे नागरिक हैराण झाले आहे. अशात राज्यातील हवामानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

आज (18 ऑक्टोबर) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता असून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Many places in the state have recorded temperatures beyond 35 degree Celsius

राज्यामध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात अनेक ठिकाणी 35 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नोंदवण्यात आले आहे.

17 ऑक्टोबर रोजी सोलापूर, वाशिम, अकोला, ब्रह्मपुरी या ठिकाणी तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक होता. तर जळगाव जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी म्हणजे 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

तर नाशिक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. आज या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

दरम्यान, देशाच्या बहुतांश भागातून मान्सून परत फिरला आहे. तर राजस्थान आणि हरियाणामध्ये चक्रकार वारे वाहताना दिसत आहे.

तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्या जवळच्या भागांमध्ये चक्रकार वाऱ्यांची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.