Rohit Pawar | पोलिसांना खाजगी कामगार असल्याप्रमाणे वागवणं अत्यंत संतापजनक; ‘त्या’ प्रकरणावर रोहित पवारांची संतप्त

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरासमोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

त्यांच्या घरासमोर भाजप पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्र्यांच्या घरासमोरच हात उचलण्यापर्यंत भाजप कार्यकर्त्याची मजल जात असेल तर ही सत्तेची धुंदी आणि पोलिसांना आपले खासगी कामगार असल्याप्रमाणे वागवण्याचा अत्यंत हीन आणि संतापजनक प्रकार आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Police Force is a reputed police force in the country – Rohit Pawar

ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “महाराष्ट्र पोलीस दल म्हणजे देशात नावलौकिक असलेलं पोलीस दल. याच पोलीस दलाने कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस लोकांची सेवा केली.

त्याच पोलीस दलातील वर्दीवर असलेल्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर नागपूरमध्ये खुद्द गृहमंत्र्यांच्या घरासमोरच हात उचलण्यापर्यंत भाजप कार्यकर्त्याची मजल जात असेल तर ही सत्तेची धुंदी आणि पोलिसांना आपले खासगी कामगार असल्याप्रमाणे वागवण्याचा अत्यंत हीन आणि संतापजनक प्रकार आहे…

दुसऱ्या राज्यातील निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठी सुशांतसिंग प्रकरणातही महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी करण्याचा भाजपच्या लोकांनी असाच जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता.

त्यामुळं ‘म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये’, यासाठी आणि महाराष्ट्र पोलिसांची प्रतिष्ठा व सन्मान कायम राखण्यासाठी पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. या प्रवृत्तीला रोखण्यासाठीच #युवा_संघर्ष_यात्रा”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe