Share

Lalit Patil | मी पळालो नव्हतो, मला पळवण्यात आलं – ललित पाटील

🕒 1 min readLalit Patil | मुंबई: पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस त्याला मुंबईमध्ये घेऊन आले आहे. ललित पाटील याला कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याला चेहऱ्यावर कपडा टाकून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं.Related News for Youबापरे! आधी रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार,आता … Read more

Published On: 

🕒 1 min read

Lalit Patil | मुंबई: पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर मुंबई पोलीस त्याला मुंबईमध्ये घेऊन आले आहे. ललित पाटील याला कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याला चेहऱ्यावर कपडा टाकून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं.

यावेळी त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना ललित पाटील यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे.

I didn’t run away – Lalit Patil

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना ललित पाटील (Lalit Patil) म्हणाला, “ससून रुग्णालयातून मी पळून गेलो नव्हतो. मला पळवलं गेलं आहे.

या प्रकरणामध्ये नक्की कुणाकुणाचा हात आहे? याबाबत मी माहिती देईल.” ललित पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ललित पाटील (Lalit Patil) आणि भूषण पाटील या दोघांनी मिळून ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू केला होता. त्यांच्या या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापीमारी केली.

तेव्हा ललित गेल्या नऊ महिन्यापासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. यादरम्यान तो पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून गेला.

सत्ताधारी पक्षानं त्याला पळून जाण्यास मदत केली असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. अशात ललित पाटील याने केलेल्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!