PM Kisan Yojana | धक्कादायक! अपात्र असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला पीएम किसान योजनेचा लाभ

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते.

दोन हजारांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये सरकार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. या योजनेचे 14 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले आहे. तर शेतकरी आता या योजनेतील पंधराव्या हप्त्याची वाट बघत आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Government employees have looted crores of government

पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) 15 वा हप्ता जारी करण्यापूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपात्र असताना देखील काही सरकारी कर्मचाऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःला शेतकरी दाखवलं आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारची कोट्यावधींची लूट केली आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत नाही, असं असून देखील काही सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

दरम्यान, प्रधानमंत्री किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, जमिनीची पडताळणी आणि आधार कार्ड लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना या योजनेतील पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी संबंधित गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करून घ्याव्या लागतील. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलं नसेल तर शेतकऱ्यांनी ते लवकरात लवकर करून घ्यावे. शेतकरी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in) जाऊन ई-केवायसी करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe