Share

Weather Update | नागरिकांनो सावध रहा; राज्यावर घोंगावत आहे ‘तेज’ चक्रीवादळाचं संकट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातून मान्सून माघारी फिरला आहे. परंतु, मान्सूनच्या परतीच्या वाटेवर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

परिणामी अरबी समुद्रामध्ये तेज नावाचं चक्रीवादळ तयार होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई आणि परिसराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Cyclone Tej is likely to intensify in the Arabian Sea on October 21

येत्या 21 ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रामध्ये तेज चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. परिणामी मुंबई शहर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेट आणि कोमोरिन क्षेत्रात कमी ते मध्यम स्वरूपाचं ढग तयार होताना दिसत आहे. भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर चक्रीवादळ निर्माण झाल्यास येत्या नऊ दिवसात ते धडक देईल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात ऑक्टोबर हिटच्या तडाख्यानंतर बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे अनेक ठिकाणी कमाल तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे.

तर आज (19 ऑक्टोबर) राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातून मान्सून माघारी फिरला आहे. परंतु, मान्सूनच्या परतीच्या वाटेवर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र …

पुढे वाचा

Agriculture Maharashtra Marathi News weather

Join WhatsApp

Join Now