Ajit Pawar | जयंत पाटील अजित पवार गटात करणार प्रवेश? धर्मरावबाबा आत्राम म्हणतात…

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यानंतर दोन्ही गटांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

अशात आता अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम (Dharmaraobaba Atram) यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) अजित पवार गटात सामील होऊ शकतात, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Jayant Patil can come to us – Dharmaraobaba Atram

प्रसार माध्यमांशी बोलत असताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “जयंत पाटील आमच्याकडे येऊ शकतात. या गोष्टीला आम्ही नाकारत नाही. कारण ते आमच्या संपर्कात आहे.

त्यांचं अजित पावर (Ajit Pawar) गटातील वरिष्ठ नेत्यांशी बोलणं सुरू आहे. जयंत पाटील यांच्यासह जे आठ नेते आहे, ते देखील आमच्यासोबत येऊ शकतात.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. त्याचबरोबर दोन्ही गटात राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावरून वाद सुरू आहे.

अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. “अजित पवार (Ajit Pawar) गटातील काही नेत्यांची शरद पवार गटात येण्याची इच्छा आहे.

त्यांचे बरेच नेते आमच्या संपर्कात आहे. त्यांच्या संदर्भात योग्य वेळी शरद पवार साहेब निर्णय घेतील,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेमकं कोण कोणत्या गटात जाणार आहे? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe