🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सुनील कावळे (वय 45 वर्षे) असं या तरुणाचं नाव आहे. यानंतर मराठा समाजाचं आंदोलन आणखीनच तीव्र होणार आहे. अशात आता या तरुणाची सुसाईड नोट समोर आली आहे. आधी मराठा आरक्षण आणि मग इलेक्शन, असं त्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी माता हिंदूधर्मरक्षरक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. मी सुनील बाबूराव कावळे, मु. पो. चिकणगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना, असं त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.
पुढे ते म्हणतात, “एक मराठा एक लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण. 24 ऑक्टोबर हा मराठा आरक्षणाचा दिवस आहे, त्यामुळे सर्वांनी आता मुंबईमध्ये या.
आपण कोणत्याच नेत्याच्या सभेला जायचं नाही. आता कुणी काहीही बोलू द्या, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि माघार देखील घ्यायची नाही.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आपण मुंबईमध्ये उपोषण करू. आपल्याला आपलं आंदोलन शांततेत करायचं आहे. कारण हा शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या भविष्याचा प्रश्न आहे.
आधी मराठा आरक्षण आणि मगच इलेक्शन असं मला वाटलं होतं. मला वाटलं, म्हणून मी केलं, यासाठी मी क्षमा मागतो, मला सर्वांनी माफ करावं.”
We will get reservation – Manoj Jarange
दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “या सरकारमुळे आमचे बळी जात आहे. माझी मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी त्यांचा जीव देऊ नये, कारण आपल्याला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार आहे.
इतके वर्ष तुम्ही वाट बघितली आहे, आणखीन थोडे दिवस प्रतीक्षा करा. मराठा आरक्षणासाठी आमच्या एका बांधवांने आत्महत्या केली आहे.
आमचा एक गडी कमी झाला आहे. सरकारने आमच्या भावाचे बलिदान वाया जाऊ देऊ नये, त्यांनी आम्हाला तातडीने आरक्षण घ्यावं”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Govt Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Manoj Jarange | मराठा तरुणाच्या आत्महत्येवरून मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले…
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना पुढच्या महिन्यात मिळणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता? पाहा अपडेट
- Supriya Sule | सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळे म्हणतात…
- Maratha Reservation | मराठा आंदोलन आणखीन तीव्र होणार? आरक्षणाची मागणी करत असलेल्या तरुणाची आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











