Manoj Jarange | मराठा तरुणाच्या आत्महत्येवरून मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले…

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे.

या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सरकारमुळे आमचे बळी जात आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

We are being victimized by the government – Manoj Jarange

प्रसार माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “या सरकारमुळे आमचे बळी जात आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आपण सरकारला सोडणार नाही.

आपल्याला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे माझी मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी त्यांचा जीव देऊ नये. इतके वर्ष तुम्ही वाट बघितली आहे. आता आणखीन थोडे दिवस प्रतीक्षा करा.

आपल्या तरुणांचे बळी जायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? सरकारला यांचे अजून किती जीव घ्यायचे आहे काय माहित? आमच्या एका मराठी बांधवांने आत्महत्या केली आहे.

आमचा एक गडी कमी झाला आहे. सरकारने आमच्या या भावाचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यायला हवा. 24 ऑक्टोबरनंतर जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर त्यानंतर होणारं आंदोलन सरकारला परवडणार नाही.”

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करणाऱ्या सुनील कावळे या 45 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मुंबई शहरातील वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर त्याने आपला जीव दिला आहे. या घटनेनंतर मराठा आंदोलन आणखीन तीव्र होणार असल्याच्या चर्चा आता राज्यात सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.