Manoj Jarange | आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही – मनोज जरांगे

Manoj Jarange | जुन्नर: गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू केलं.

आता त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पेटल्याचं दिसत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसांचा कालावधी दिला होता.

24 ऑक्टोबर 2023 रोजी ही मुदत संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला इशारा दिला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी मिळणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

We should get reservation on 24th – Manoj Jarange

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “24 तारखेला आम्ही दिलेली मुदत संपणार आहे. त्यादिवशी आम्हाला आरक्षण पाहिजे. नाहीतर मोठं आंदोलन होईल. कायदा पारित करण्यासाठी शासनाला पुरावे हवे होते.

एक महिन्यामध्ये सरकारला पुरावे मिळाले आहे. सरकारला पुरावे मिळाले नसते तर आम्ही काही म्हटलं नसतं. मात्र, आता सरकारकडे पुरावे आहे. त्यामुळे आता सरकारला आरक्षण मिळाल्याशिवाय सुट्टी नाही.

कायद्यामध्ये बदल करून मराठा समाजाला आरक्षण द्या. सरकारने दुसऱ्यांना आरक्षण देताना कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र पाहिले नाही. मात्र, आता आमच्याकडे पाच हजार कागद आहे.

त्याचा आधार घेऊन तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देता येईल. विनाकारण ढकलाढकली करू नका, 24 तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण पाहिजे.”

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने काल गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुनील कावळे या 24 वर्षे तरुणाने आत्महत्या केली आहे.

मुंबई शहरातील वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर त्याने आपला जीव दिला आहे. या घटनेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच तापणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.