Manoj Jarange | मराठा तरुणांने आत्महत्या करणं, हे सरकारचं पाप – मनोज जरांगे

Manoj Jarange | नवी मुंबई: मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

त्यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांचं आंदोलन सुरूच आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आंदोलन करणाऱ्या एका तरुणाने काल गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. मराठा तरुणाने केलेली आत्महत्या, हे सरकारचं पाप असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “आमच्या सुनील कावळे या तरुणाने केलेली आत्महत्या हे राज्य शासनाचं पाप आहे. आमच्या मराठा बांधवांचं हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही.

मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी आम्ही राज्य सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला होता. 24 ऑक्टोबर 2023 रोजी ही मुदत संपणार आहे. तोपर्यंत सरकारने जर आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर पुढील आंदोलन सरकारला झेपणार नाही.”

Within a month, the government has received evidence – Manoj Jarange

“मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाला पुरावे हवे होते. एका महिन्यामध्ये सरकारला पुरावे मिळाले आहे. कायद्यामध्ये बदल करून मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं.

शासनाने दुसऱ्यांना आरक्षण देताना कोणत्याही प्रकारचे पुरावे मागितले नाही. परंतु, आता आमच्याकडे 5000 पुरावे आहेत. त्यामुळे सरकारला आम्हाला आरक्षण घ्यावं लागणार आहे.

24 तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण पाहिजे, विनाकारण ढकलाढकली करू नका”, असं देखील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.