Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! कंत्राटी भरतीचा जीआर रद्द

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Devendra Fadnavis | मुंबई: कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्याचबरोबर या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने आंदोलन देखील सुरू केलं होतं.

अशात या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय 13 मार्च 2003 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना झाला असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

The first contract recruitment was started during the Sharad Pawar era – Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “शरद पवार यांच्या काळात शिक्षण विभागात पहिली कंत्राटी भरती सुरू केली होती.  अशोक चव्हाण यांनी जीआर देखील काढला होता.

यामध्ये तांत्रिक, लिपिक, शिपाई, वाहक चालक पदांचा जीआर काढण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 01 सप्टेंबर 2021 ला आरएफबीला सरकारची मान्यता मिळाली होती. कंत्राटी भरतीचे दोषी कोण आहे? हे समोर आलं पाहिजे.”

पुढे ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “कंत्राटी भरतीचं संपूर्ण पाप काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे.

आमच्याही काळात कंत्रातील लोक घेतली. मात्र, विरोधक आता आंदोलन करत आहे. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत चर्चा केली आहे.

आम्ही कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने युवकांची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागितली पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe