🕒 1 min read
Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ड्रग्स प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांची मती थोडी गुंग झाली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांची कुत्ता गोळीची नशा कधी उतरतच नाही, असं म्हणतं चित्रा वाघ यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.
ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “दररोज सकाळी पिसाळल्यागत भुंकणा-यांना पाहिल्यानंतर जनतेला कळालंच असेल की कुत्ता गोलीची नशा कोण करतंय ते, सर्वज्ञानी संजय राऊत दररोज सकाळी तोंड उघडल्यानंतर जे काही बरळतात.
त्यावरून कळतं की त्यांची कुत्ता गोळीची नशा कधी उतरतच नाही. कुत्ता गोलीच्या नशेत असल्यामुळेच सर्वज्ञानी संजय राऊतांच्या तोंडून महिलावाचक शिवीगाळ येते.
बाळासाहेबांच्या विचारांना सोडून औरंगजेबाच्या थडग्यावर मस्तक टेकवणारे कुत्ता गोळीच्या नशेतच असावेत. हिंदुत्वाचा विचार सोडून कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणा-यांनी कुत्ता गोळी घेतली असावी.
कोविड घोटाळ्यातील भ्रष्टाचार, पत्राचाळीतील भ्रष्टाचार हे गुन्हे कुत्ता गोळीची नशा करूनच केले असावेत. उद्धव ठाकरेंच्या आसपास असे कुत्ता गोळी खाणारे नशेबाज असल्यामुळेच त्यांचा पक्ष उद्ध्वस्त झाला.
कुत्ता गोळीची ही नशा डोक्यात इतकी भिनलीय की, आता भ्रमिष्ट झालेल्या संजय राऊतांना महायुती सरकार करत असलेला महाराष्ट्राचा विकासही दिसेनासा झाला आहे. 2024 च्या निवडणुकांनंतर यांची ही कुत्ता गोळीची भयानक नशा नक्की उतरेल.”
Don’t pay attention to Devendra Fadnavis – Sanjay Raut
दरम्यान, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, “मोठं नेक्सेस उघड करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहे.
परंतु, मोठं नेक्सेस उघड झालेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लक्ष देऊ नका. सध्या ते भरकटलेल्या सारखे बोलत आहे. फडणवीस भाग पीत नसतील, परंतु त्याच्या वासाने त्यांना नशा येत आहे. देवेंद्र फडणवीस यांची मती थोडी गुंग झालेली आहे.”
महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ | भारतीय संघाला मोठा झटका! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर
- Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! कंत्राटी भरतीचा जीआर रद्द
- Manoj Jarange | मराठा तरुणांने आत्महत्या करणं, हे सरकारचं पाप – मनोज जरांगे
- Govt Job Opportunity | केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Devendra Fadnavis | नशा करणारे असे बेताल वक्तव्य करतात; संजय राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप नेत्याचं उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










