MPSC Recruitment | एमपीएससी मार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एमपीएससी भरतीची वाट बघत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी एमपीएससीमार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून एमपीएससीने अर्ज मागविले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 379 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये प्राध्यापक 32, सहयोगी प्राध्यापक 42, सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक 214 आणि अधिव्याख्याता 86 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

ऑनलाईन अर्ज करा (Apply online)

https://mpsc.gov.in/

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://mpsc.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1oWTcaI66K77lzvs8uDbfh2TBgeKuYBiI/view

https://drive.google.com/file/d/1Uk_mirdnV9Bs3P383TwCbKXe78DXmlx0/view

https://drive.google.com/file/d/1T-_O7p6Hy1yEyhi0jgvV5PiHXvjxlHlh/view

https://drive.google.com/file/d/1_1IL8G7jemV1S_BU92_-4wxHbcMgITTd/view

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.