Weather Update | राज्यातील तापमानात चढ-उतार कायम, पाहा हवामान अंदाज

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रातून मान्सून परत फिरला असून राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच वाढत आहे.

अशात राज्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामुळे नागरिकांना ऑक्टोबर हिट पासून थोडासा दिलासा मिळाला आहे.

अशात आज (21 ऑक्टोबर) राज्यात कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Northeast Monsoon likely to become active over South India for two days

राज्यासह देशातून मान्सूनने निरोप घेतला आहे. तर दक्षिण भारतात दोन दिवस ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

परिणामी राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तर दुसरीकडे आज मुंबई आणि गोव्याच्या किनारी भागांमध्ये ‘तेज’ चक्रीवादळ धडकणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

आज मुंबईसह किनारी भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई आणि किनाऱ्यालागच्या भागावर तेज चक्रीवादळाचं सावट ओढवत असताना अकोला जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

अकोला जिल्ह्याचे तापमान काल 36.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर जळगाव, सांताक्रूझ आणि सोलापूर या भागात देखील 36 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नोंदवण्यात आले आहे.

अशात आज राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा देखील हवामान खात्याने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe