Ajit Pawar | कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार; म्हणाले…

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शासनाने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.

काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं हे पाप होतं असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. तर भाजपचं हे पाप असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. अशात आता या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

A misconception has been spread among the unemployed youth – Ajit Pawar 

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मी असलेल्या सरकारमध्ये सर्वात जास्त नोकरी भरती झाली आहे.

आतापर्यंत तब्बल दीड लाख मुला-मुलींची भरती झाली आहे. पहिल्यांदाच हे असं घडलं आहे. परंतु, बेरोजगार युवा पिढीमध्ये गैरसमज पसरवण्यात आला आहे की, तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जातील. कंत्राटी भरतीवर हे सर्व सुरू आहे. विरोधकांनी जाणवपूर्वक हे सर्व घडवून आणलं आहे.”

दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप प्रवक्ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महाविकास आघाडीवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “हातच्या कंकणाला आरसा कशाला, ही म्हण महाविकास आघाडीचे बोलबच्चन नेते सफशेल विसरले. आपणच घेतलेल्या निर्णयाची माहिती या नेत्यांना नाही.

कारण हे सगळे फेसबुकवादी!! खोटी माहिती पसरवून तरुणांची डोकी तापवण्यात यांचा ‘ हात ‘ कोणी पकडू शकत नाही. कंत्राटी भरतीचा निर्णय कोणी घेतला, कधी घेतला..हे सारेच कागदोपत्री आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात, शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात हा खटाटोप झाला. उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं हे पाप होतं. आपले ठेवावे झाकून, दुसऱ्याचे पाहावे वाकून अशी यांची नियत.!

तेच झाले याही विषयात. आज हा मामला उघडा पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी कंत्राटी भरती रद्द करून हजारो तरुणांना दिलासा दिला आहे.

राज्य सरकार आणि देवेंद्रजींनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आता खोटारड्या, दुतोंडी महाविकास आघाडीनं संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. दुसरा पर्यायच नाही !!”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.